तंबाखूच्या पानांचा शेतीसाठी कीटकनाशक म्हणून वापर .
उपयोग :- वरील मिश्रण पिकावरील अळी, लहान तुडतुडे इ. किडीवर वापरता येते.
- 400 ग्रॅम तंबाखूच्या पानांचे बारीक तुकडे करून ते चार लिटर पाण्यात एक दिवस भिजत ठेवावे.
- त्यानंतर ते थोडावेळ तापवावे. त्या पानांच्या तुकड्यांना पिळून काढावे. नंतर हे द्रावण स्वच्छ कापडातून गाळून भांड्यात जमा करावे.
- दुसऱ्या एका भांड्यामध्ये शंभर ग्राम साबण घेऊन त्याचे बारीक तुकडे एक लिटर पाण्यात भिजत ठेवावे.
- दोन्ही मिश्रण एकत्र करावे आणि थोडावेळ ते ढवळावे.
उपयोग :- वरील मिश्रण पिकावरील अळी, लहान तुडतुडे इ. किडीवर वापरता येते.
