Saturday, November 24, 2018

लाल कांदा शेतीसाठी वापर

लाल कांदा शेतीसाठी वापर
वापरावयाचा भाग:- कांदा
पद्धत:-
-  कांदे पाट्यावर बारीक वाटून ते दोन ते चार चमचे गोडेतेलात एक दिवसासाठी भिजत ठेवावे.
-  कांद्याचा अर्क अर्धा लिटर साबणाच्या पाण्यात मिसळा व मिश्रण ढवळून एकजीव करा.
-  तयार झालेले मिश्रण स्वच्छ कापडातून गाळून घ्या.
-  त्यानंतर एक भाग मिश्रण 20 भाग पाण्यात मिसळून ते फवारणीसाठी वापरा.
उपयोग:-
रोग:- सर्व बुरशीजन्य रोगासाठी जसे फळ आणि खोड उजव्या, खोड आणि मूळ कुजव्या, पानावरील छिद्रे, विल्ट पानावरील चिकटा, मूळ कुजव्या,
या सर्व रोगासाठी लाल कांदा चा वापर होतो.

Saturday, November 17, 2018

जीवामृत कसे बनवावे ?

जीवामृत कसे बनवावे ?
साहित्य :-
  १) शेण ( देशी गाईचे )           - १० किलो
  २) गोमूत्र                            -  ५ / १० लिटर
  ३) काळा किंवा लाल गुळ      - २ किलो
  ४) कडधान्य पीठ (बेसन)      - २ किलो
 ५) बांधावरची / जीवाणू माती  -  १ किलो
 ६) पाणी  -  २०० लिटर


पद्धत  :-
  • २०० लिटर क्षमतेचा ड्रम घेऊन त्यामध्ये १०० लिटर पाणी ओतावे.
  • त्यामध्ये १० किलो गाईचे शेण व १० लीटर गोमूत्र टाकून मिश्रण चांगले ढवळावे.
  • २ किलो जुना काळा गुळ व २ किलो कडधान्य पीठ त्यामध्ये टाकून ते मिश्रण पुन्हा चांगले ढवळावे. 
  • नंतर उरलेले १०० लिटर पाणी ड्रम मध्ये ओतून हे द्रावण ७ दिवस आंबवावे.
  • अधूनमधून है द्रावण काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळावे, यामुळे जीवाणुंंची चांगली वाढ होते.
  • हे आपण तयार केलेले २०० लिटर चे जीवामृत एका महिन्यासाठी प्रति एकरी पुरेसे ठरते. 
  • शेण व गोमूत्राचे प्रमाण वाढवून दर १५ दिवसातून ही मात्रा देणे फ़ायद्याचे ठरते.
उपयोग :-
 सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
जीवाणूंंची वाढ होऊन जमिनीतील नत्र प्रमाण वाढते.

Thursday, November 15, 2018

कीड नियंत्रणात कडूलिंबाचा वापर

कडूलिंब :
           आज महाराष्ट्रामध्ये कडूलिंब हा मोठ्या प्रमाणात आढळणारा वृक्ष आहे.  पण आपण त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये कीड नियंत्रण म्हणून केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.  आणि शेतीवरील खर्च कमी होईल.
  • वापरावयाचा भाग :  वाळलेल्या निंबोळ्या 
  • निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत :  
 - ५ किलो वाळलेल्या निंबोळ्या बारीक कुटुन रात्रभर १० ते१२ लिटर पाण्यात भिजत ठेवा.
-  सकाळी तो अर्क कापडाने चांगला गाळून घ्या.
-  गाळलेल्या अर्कात १०० लीटर पाणी टाकून मिश्रण तयार करा.  या मिश्रणातून अर्धा लिटर मिश्रण वेगळे घेऊन त्यामध्ये २०० ग्राम साबणाचा चुरा मिसळा आणि हे द्रावण अर्कात एकत्र करा.

फायदे / उपयोग 
 १) किटकनाशक म्हणून-
 किडीची वाढ खूंटते, कीड मरते, किडीची प्रजनन क्षमता     कमी होते. अंडी कमी प्रमाणात घालतात.
 २) भक्षण रोधक म्हणून
 ३) अर्काची भूकटी किंवा पेंड मातीत मिसळल्यास सूत्रकृमीचा नाश होतो.
 ४) नुकसान कारक किडीचे व्यवस्थापन होते. खालील कीड व्यवस्थापनामध्ये याचा उपयोग होतो.
 मावा, पाने पोखरणारी अळी, घाटेअळी, पांढरमाशी,             तुड़तूड़े इ.

तंबाखूच्या पानांचा कीटकनाशक म्हणून वापर

तंबाखूच्या पानांचा शेतीसाठी कीटकनाशक म्हणून वापर .                                                                             400 ...